नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक येथील कार्यालयात चांदवड तालुक्यातील उसवाडचे सरपंच संजय पवार यांच्यासह उपसरपंच, सहा सदस्य व बहुसंख्य कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत पक्षाचे विचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, चांदवड तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर, निफाड पूर्वच्या महिला तालुकाध्यक्ष सुरेखा नागरे, डॉ.वैशाली पवार, उसवाडचे उपसरपंच रवींद्र बीडगर, सदस्य भारत आहिरे, जिभाऊ बटाव, मोठाभाऊ शिंदे, यांच्यासह प्रवेशकर्ते पदाधिकारी नामदेव बिडगर, भीमराव पवार, अशोक गायकवाड, वाल्मिक शिंदे, सोमनाथ बिडगर, अण्णा पवार, एकनाथ पवार, पुंडलिक पवार, त्र्यंबक शिंदे, अनिल बिडगर, संजय बिडगर, भाऊसाहेब पवार, संतोष पवार, सुनील बिडगर, विष्णू बिडगर, प्रदीप पवार, आकाश न्याहारकर, कमल पवार, शालन पवार, अमृत आंबेकर, अर्जुन आंबेकर, महेश गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.