चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –चांदवड येथील रेणूका मातेच्या शारदीय नावरात्रोस्तवाला देवीच्या महाभिषेक होऊन सुरुवात झाली. सकाळी चांदवड येथील प्रसिध्द अहिल्याबाई होळकर यांच्या रंगमहालतून देवीच्या सोन्याच्या मुखवट्याची व आभूषणाची पालखी गावातून निघून ती मंदीरात आली. येथे देवीला मुकुट अपर्ण करण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्ष मंदिर बंद होते. मात्र यंदा मुक्त वातावरणात नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. तर अनेकांची कुलस्वामिनी असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक येथे घटी बसण्यास येत आहेत..