मधूर गुजराथी
चांदवड – तालुक्यातील धोंडगव्हाण वाडी शिवारातील योगेश सुरेश बस्ते यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. चार ते पाच महिन्याचा हा बिबट्या असल्याचे बोलले जात आहे. शेतकरी योगेश बस्ते यांनी वनपाल व वनरक्षक वडनेर भैरव यांना दूरध्वनी वर या बिबट्याविषयी माहिती दिली .
चांदवड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे चांदवड यांच्या आदेशावरून .वन परिमंडळ अधिकारी वडनेरभैरव देविदास चौधरी ,वनरक्षक विजय टेकनर् वनरक्षक पारेगाव वाल्मीक व्हरगळ, वनमजूर वसंत देवरे,वाहन चालक अशोक शिंदे. यांच्यासह घटनास्थळी तात्काळ जाऊन हा वन प्राणी विहिरीतून काढण्यात आला. हा बिबट्या मृतावस्थेत विहिरीतील पाण्यात तंरगलेला दिसून आला. त्यास वन कर्मचारी व स्थानिकांच्या मदतीने खाटेच्या व दोराच्या सहाय्याने वर काढण्यात आले. त्यानंतर त्यास शासकीय वाहनाने वडनेर भैरव येथे आणून त्यास पशुधन विकास अधिकारी वडनेर भैरव डॉ. काटे यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले .
व शासकीय वाहनाने बिबट्याचा मृतदेह चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय मधील वसाहतीमध्ये दहन करण्यात आल्याची माहिती वन परिमंडळ अधिकारी वडनेर भैरव देविदास चौधरी यांनी दिली.