मधूर गुजराथी
चांदवड – तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ पतीने विहीरीत उडी मारल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही आत्महत्या प्रकरणी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खेलदरी येथील रेखा किरण दौंड (३०) या महिलेने शनिवार १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याने तिचा भाचा बाळासाहेब दौंड यांनी औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषीत केली. ही घटना घडत नाही तोच मयत रेखा दौंड हिचे पती किरण चिंधु दौंड (३५) रा. खेलदरी याने रविवार पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील विहीरीत पाण्यात उडी मारुन आपली जीवन यात्रा संपवली. या आत्महत्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय घुमरे हे तपास करीत आहे. तर दोघांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहेत.