मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी चांदवड शहरातील मुलभुत प्रश्नाकडे लक्ष वेधुन सकाळी साडेवाजता आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांच्या समवेत शेकडो आदिवासी पुरुष, महिला उपोषणास बसल्या होत्या. शहरातील अनेक मुलभुत प्रश्नावर यावेळी चर्चा झाली अखेर दुपारी तीन वाजता मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी उपोषण सोडले. यावेळी कोतवाल यांच्या समवेत माजी नगरसेवक अॅड.नवनाथ आहेर,सुनील कबाडे, अनिल कोतवाल, कैलास कोतवाल, विलास पवार, अदित्य फलके, राहुल कोतवाल, मंजुर घासी, भारती देशमुख ,किरण वाघ, वाहीद पठाण,भिकचंद व्यवहारे,गणेश खैरनार,जाकीर शहा, राजु बिरार,विजय सांबर, गोकुळ देवरे, भरत माळी, संभाजी सोनवणो,महावीर संकलेचा, राजाभाऊ आहिरे,आंनद बनकर आदिसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिरीषकुमार कोतवाल यांनी उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, चांदवड नगरपरिषद हद्दीतील मुलभूत व नागरी सुविधाचा अभाव तसेच शासकीय योजना जनतेसाठी असतांना त्या राबविणो कामी नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष व त्यामुळे आदिवासी व चांदवड शहरातील इतर नागरीक वंचित ठेवले जात असल्याने नागरिकांचे प्रश्न तसेच शासनाच्या योजना तातडीने जनतेपर्यंत पोहचिवणोकामी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन दि.4 एप्रिल रोजी दिलेले होते. व पंधरा दिवसाचे आत मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार असल्याची पुर्वकल्पना प्रशासनास दिलेली होती.मात्र काही उपयोग झाला नाही त्यामुळे कोतवालांनी उपोषण सुरु केले होते.