मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड नगरपरिषद हद्दीतील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेच्या अनुदान रक्कमा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात तसेच नवीन डीपीआर.यादी मंजुर करावी अशी मागणी चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केले असून या प्रकरणी नोटीस देऊनही कार्यवाही न झाल्याने सोमवार १८ एप्रिल पासून शिरीष कोतवाल हे चांदवड नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली
.दरम्यान या प्रकरणी दोषी व्यक्तीवर त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद, पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदवड नगरपरिषद हद्दीत अदिवासी बांधव राहत असून नगरपरिषद स्थापन झाल्यापासून ते आजपावेतो घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागला आहे. २०१८-१९ या कालावधीत सर्वच प्रवर्गातील गरीब कुटूंबातील रहिवासांनी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात फक्त १२० लाभार्थ्यांनी घर बांधकामे करण्यास सुरुवात केली. त्यात काही लाभार्थ्यांना सुरुवातीस रक्कमा मिळाल्या आहेत. तर ब-याच लाभार्थ्यांचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहेत. ही संख्या जास्त आहे. याबाबत संबधीत लाभार्थ्यांनी चौकशी केली असता राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर वाटप केले. मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असतांना १२० अवघ्या घरांना मंजुरी दिली जाते. तर चांदवड शहरातील अजुनही असंख्य गरीब रहिवासी कच्च घरात राहतात सध्या १२० मंजुर घरकुलांपैकी ८२ घरकुले आजही अनुदानापासून वंचीत आहेत. गेल्या चार वर्षापासून त्यांना स्वताच्या हक्काच्या घरापासून वंचीत राहावे लागत असून वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही लाभार्थ्यांचे पैसे देण्यास असमर्थ असल्याने याप्रश्नी येत्या सोमवारपासून नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे माजी आमदार कोतवाल यांनी सांगीतले.