चांदवड – चांदवड येथील कुलदैवत श्री. रेणुका माता मंदिरात विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा. नीलमताई गो-हे यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी महाआरती करण्यात आली. तर एक तासाची कुंकुमअर्चा पुजा करण्यात आली. यावेळी श्री. रेणुका देवी संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी त्यांचा सत्कार केला तर चांदवड येथील श्री.रेणुका देवी मंदिराच्या विकासकामासाठी अजुन ब-याच निधीची आवश्यकता असून याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. तर यावेळी चांदवड येथील पुरातन रंगमहाल ( होळकरवाडा ) ची मोठी दुरावस्था झाली असून तो पर्यटकासाठी खुला व्हावा त्यातील रेंगाळलेली कामे व्हावी याकडे श्रीमती गो-हे यांचे लक्ष वेधले यावर निलमताई गो-हे यांनी सांगीतले की, पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत लवकरच एक बैठक घेऊन येथील विकास कामाबाबत पाठपुरावा करु, आतार्पयत आलेला निधी किती, त्यात काय काय सुधारणा झाल्या व पुढील व्हीजन काय याबाबत माहिती घेऊन या रंगमहालाच्या विकासासाठी प्रयत्न करु असे आश्वास गो-हे यांनी दिले या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी जोशी, तहसीलदार प्रदीप पाटील, शिवसेनेचे नगरसेवक जगन्नाथ राऊत, श्री. रेणुका देवी मंदिराचे पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.