चांदवड- ओबीसी आरक्षणासाठी गणुर चौफुली येथे भाजपाच्या वतीने रास्ता रोको करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक काका व्यवहारे,भूषण कासलीवाल,डॉ.आत्माराम कुंभार्डे,बाळासाहेब माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चांदवड तालुक्यातील आणि खेडोपाडी असलेल्या शेतकरी व मराठमोळ्या जनतेसाठी हे राज्य सरकार जनतेची दिशाभूल करतंय असा आरोप करण्यात आला.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द का झाले यांचे कारणे दाखवा मराठा आरक्षण टिकवता आले नाही आणि ओबीसीला देखील डंक लावला असा संताप जनक सवाल आंदोलकांनी यावेळी केला. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द ठरवले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा पदाधिकारी भूषण कासलीवाल, अशोक काका व्यवहारे, डॉ.आत्माराम कुंभार्डे, यांनी पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांना निवेदन दिले. यावेळी मन्सूरभाई मुळांनी, गणेश महाले, विशाल ललवानी, सुभाष पुरकर, अंकुर कासलीवाल, किशोर क्षेत्रीय, बापू भवर,विजय धाकराव,जगदीश कोल्हे, योगेश ढोमसे, संजय पाडवी, आत्माराम खताळ, किरण बोरसे, मनोज बांगरे, निलेश काळे, मुकेश आहेर, गणेश पारवे, साईनाथ कोल्हे, प्रशांत ठाकरे, बाळासाहेब माळी, दिशांत देवरे, राहुल हाडगे, वाल्मीक वानखेडे, राजेश गांगुर्डे, योगेश बोरसे,सागर आहेर,नितीन फंगाळ आदी नागरिक उपस्थित होते.