मधूर गुजराथी
चांदवड – येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा राष्ट्रीय सेवा योजनेचा सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन चांदवड तालुक्यातील कळमदरे येथे संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर.डी. बागडे ,सरपंच श्रीमती नीलम जाधव गटनिदेशक ए. के. वाघ राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डी.एल.दंडगव्हाळ आदी उपस्थित होते. या शिबिरात विविध प्रकाराचे व्याख्याने ,वृक्ष लागवड व श्रमसंस्कार संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांन कडून करून घेण्यात येणार आहे. या शिबिरास संस्थेच्या ३० प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदवला आहे .यावेळी कळमदरेचे उपसरपंच राजेश गांगुर्डे, पोलीस पाटील अशोक गांगुर्डे ,शालेय समितीचे अध्यक्ष गोरख गांगुर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार जाधव, उपाध्यक्ष अंबादास गांगुर्डे, मुख्याध्यापक घुमरे सर ,ग्रामपंचायत सदस्य सुरेश गांगुर्डे ,यादव सर ,दादा गांगुर्डे, प्रवीण पवार ,मोठा भाऊ गांगुर्डे ,वाल्मीक गांगुर्डे ,श्रवण गांगुर्डे भूषण पवार ,समाधान गांगुर्डे ,तसेच प्रशिक्षण संस्थेचे निदेशक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.