मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रमचे संस्थापक कर्मवीर केशवलाल आबड उर्फ काकाजी यांच्या सुनबाई व श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचार्यश्रमचे विश्वस्त समितीचे सचिव जवाहरलाल आबड यांच्या धर्मपत्नी शकुंतला जवाहरलाल आबड (८६) यांचे रविवार ३ एप्रिल रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. चांदवड येथील आबड परिवारातील सामाजिक कार्यकर्ती म्हणून असलेल्या शंकुतला जवाहरलाल आबड यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला, त्यांचा नेहमीच उत्साह दांडगा असायचा त्यांनी अनेक प्रकारची शिबीरे घेऊन जैन संघटनेचे काम जोरदार केले तर आतार्पयत २००२ मध्ये आदर्श नारी रत् न पुरस्कार , २००४ मध्ये आदर्श पती पत्नी पुरस्कार,समाजगौरव पुरस्कार, २००७ मध्ये राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, श्री.त्रिलोकरत्न स्थानिक जैन धार्मिक परिक्षा बोर्डे गौरवपत्र, उपाध्याय श्री.यशोविजयजी संस्कार सदन ट्रस्टद्वारा गौरव, श्री. जैन श्वेताबंर नाकोडा पाश्र्वनाथ तीर्थ ट्रस्ट , जैन विशारद पदवी , चांदवड न्यायालय पॅनल जज्ज, आदर्श श्रविका , आदर्श महिलारत्न , आदर्श अध्यापिका,लोकमत सखीमंचच्या माध्यमातुन विविध कार्यक्रमात सक्रीय सहभाग , सामाजिक तळमळ पुरस्कार, २६ जानेवारी २००६ रोजी टी.व्हीवर आदर्श महिला म्हणून मुलाखत अशा या शंकुतला आबड यांनी सामाजिक क्षेत्रतील काम उल्लेखनीय केले होते.त्या सर्वत्र भाभी म्हणून परिचीत होत्या त्यांची सामाजिक कार्य करण्याची तळमळ कायम असत त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, मुली, नातु पंतु असा परिवार आहे.