चांदवड -तालुक्यातील उर्धुळ येथे शनिवारीपहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास देवरगाव ते दरसवाडी या ठिकाणावरून पिसाळलेले कुत्रे येऊन उर्धुळ येथील अकरा नागरिकांना चावा घेतल्याची घटनाा घडली आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत तयार झाली आहे.
कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांमध्ये सुनील सुखदेव बडे (४५) दरसवाडी, ओम सचिन गवळी ( ६) रा . विजयनगर धोंडबे, संजय कारभारी नवले (४५ ) उर्धुळ, अरुण विष्णू नवले ( ४५ ) हर्षदा संदीप नवले (१० ) स्नेहल संदीप नवले ( ८ ) सार्थक रमेश ठाकरे (१३ ) गोकुळ अशोक पवार (३५) आर्यन सुनील ठाकरे ( ६ )माधव फकिरा ठाकरे (३५) सुदर्शन संजय ठाकरे (१५) हर्षद संजय ठाकरे (१५) सर्व राहणार उर्धुळ ही नावे आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास घराबाहेर झोपेच्या अवस्थेत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने यांना चावा घेतला. त्यात पाहुणा आलेल्या सहा वर्षाच्या बालकांचा समावेश आहे.
या घटनेमुळे उर्धुळ येथील सर्व नागरीक भयभीत झाले आहे. या सर्वाना नागरिकांच्या मदतीने चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र रुग्णालयात मात्र कुत्र्याची लस नसल्याने त्यांना दहा ते अकरा वाजेच्या सुमारास औषध उपचार केले. त्यानंतर या रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आल्याची माहिती श्रीहरी ठाकरे व रमेश ठाकरे यांनी दिली. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, गणपत ठाकरे, सागर आहेर व उधुळ दरसवाडी नागरीकांनी रुग्णांची भेट घेतली.