मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड मर्चन्ट बॅकेच्या निवडणुकी साठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनलला १७ जागा तर भूषण कासलीवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले. चांदवड मर्चन्ट बॅकेच्या १८ जागासाठी २० मार्चला मतदान झाले. आज सोमवार २१ मार्च रोजी सकाळी आठ वाजता गणूर रोडवरील चंद्रभागा लॉन्स येथे मतमोजणीस प्रांरभ झाला. रात्री उशिरा निकाल हाती आले. सहकार क्षेत्नातील मातब्बर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या सहकार पॅनलला १७ जागा तर त्यांच्या विरोधात माजी आमदार स्व. जयचंद कासलीवाल यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुन्नुभाई घासी, जगन्नाथ राऊत, सुनील डुंगरवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले.
माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या सहकार पॅनलचे सर्वसाधारण १३ जागामध्ये विजयी उमेदवार मिळालेली मते कंसात सुनिल कबाडे (१६८४) नरेंद्र कासलीवाल (१३५७ ), तर विकास सहकार पॅनलचे महेंद्र गांधीमुथा (१२८२),वाहीदखान पठाण(१११२),भुषण पलोड (१५०५) ,अदित्य फलके(१४६०) , पुष्पा राजेंद्र बिरार (११८७), दत्तात्नय राऊत(११२६ ),अशोक व्यवहारे(१२८० ) , भीकचंद व्यवहारे(१२३९),जाहीद शेख (१०७१) गुल्लुभाई उर्फ सईद खलील शेख ( ११४७), राजकुमार संकलेचा( १२४३) हे विजयी झाले तर महिला राखीव दोन जागेसाठी शिल्पा आत्माराम कुंभार्डे (१५६१), तर भारती अशोक देशमुख (१४९७ ) अनुसूचित जाती जमाती गटात एक जागेसाठी शंभुराजे खैरे ( १६६१ ), इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक जागेसाठी राहुल शिरीषकुमार कोतवाल (१६४२ ) , भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गासाठी जाकीर गफ्फार शहा (१३३४) मते मिळाल्याने आदि १८ जण विजयी झाले .विकास सहकार पॅनलला एकमेव जागेवर महेंद्र गांधीमुथा यांच्या रुपाने विजय मिळाला.
सोमवार २१ मार्च रोजी सकाळी आठ पासून मतमोजणी चंद्रभागा लॉन्स येथे झाली. निवडणुक अधिकारी पी.एस.पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार खात्यातील अधिकारी व कर्मचा:यांनी मतमोजणीचे काम बघीतले .मतमोजणीची व्यवस्था चार टेबलवर करण्यात आली . जसजसे निवडणुकीचे निकाल हाती येत होते तशी मतमोजणी स्थळी फटाक्याची प्रचंड आतषबाजी करण्यात आली .मतमोजणी स्थळी निकाल ऐकण्यासाठी सभासद व हितचिंतकांनी गर्दी केली होती . पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. या मतदान प्रक्रियेत सर्वसाधारण जागेसाठी वैद्य मते २५७५ होती त्यात बाद मते १८९ मते होती. अनुसूचित जाती जमातीत बाद मते 196 होती.महिला राखीव गटामध्ये १०२ मते बाद होती.इतर मागासवर्गीय गटात १६६ मते होती. भटक्या विमुक्त गटात १६५ मते बाद झालीत.