मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड -मनमाड रोडवरील आकाश शुज मार्टचे समोर लेंडीनाल्याजवळ अंगावर थुंकल्याचा बहाणा करुन रोख रक्कम व भ्रमणध्वनी चोरणा-या तीन जणांना नागरीकांच्या मदतीने रंगेहाथ पाठलाग करुन पकडले. भरदिवसा ही घटना घडली. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोयेगाव येथील उज्वल इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष व कॉँग्रेसचे जेष्ठ नेते उत्तम भागुजी ठोंबरे यांचे चालक राजेंद्र म्हसु पोटे हे शनिवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास चांदवड येथील लेंडी नाल्याजवळून पायी जात असतांना ही घटना घडली. पोटे यांना रस्त्यातील तीन जणांनी तुमच्या पाठीमागे कोणीतरी थुंकले आहे असे सांगितले. त्यामुळे ते खाली वाकले त्यानंतर त्यांच्या खिशातून विवो कंपनीचा भ्रमणध्वनी किमंत रुपये १७ हजार रुपये तर रोख रक्कम पाच हजार रुपये रोख असा माल घेऊन हे तीन जण पळून गेले. त्यानंतर राजेंद्र पोटे हे चोर -चोर ओरडले. त्यानंतर परिसरातील भास्कर खैरे, विकी खैरे, संजय पाटील, प्रसाद प्रजापत, उत्तम ठोंबरे यांनी पळून जाणा-या या तीघांचा पाठलाग केला. त्यातील एक जण दुचाकी बसत असतांना नागरीकांनी त्यास पकडले. तो दुचाकी वरुन पडल्याने त्याला पकडले. पकडण्यात आलेल्यांचे नाव अक्तर बेग अजगर बेग रा. मालेगाव असून इतर दोन जण रिक्षात बसून पळून गेले. मात्र या रिक्षातील दोघांनाही पोलीसांनी पकडले. त्यांची नावे शेख अशपाक शेख मुनीर , आरीफ खान बुंडन खान सर्व तिघे रा. मालेगाव आहे. या चोरीप्रकरणी चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र बिन्नर हे तपास करीत आहेत.