मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड मर्चन्ट बॅकेच्या १८ जागासाठी १५ मार्चला मतदान होणार असून १० फेब्रुवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असल्याची माहिती निवडणुक अधिकारी तथा चांदवडचे सहाय्यक निबंधक पी.एस.पाटोळे यांनी दिली.नाशिक जिल्हयातील व चांदवड तालुक्यातील अग्रगण्य व नावारुपास आलेली चांदवड मर्चन्ट बॅकेच्या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रतील अनेकांचे लक्ष लागुन राहीले आहे. सभासद संख्या ३३११ असून १८ जागासाठी निवडणुक लागली असून त्यात सर्वसाधारण १३, अनुजाती जमाती एक, इतरमागासवर्ग एक, विमुक्त जाती भटक्या जाती एक, व महिला राखीव दोन अशा १८ जागावर निवडणुक होणार असून १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २२ र्पयत उमेदवारी अर्ज दुपारी एक ते तीन वाजेर्पयत भरणो, छाननी १७ फेब्रवारी रोजी अकरा वाजता, १८ फेब्रुवारी ते ४ मार्च २२ सकाळी ११ ते ३ वाजेर्पयत माघारी , ७ मार्च निशाणी वाटप व अंतीम यादीचे प्रकाशन मतदान १५ मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेर्पयत होईल. १६ मार्च रोजी सकाळी आठ पासून निवडणुक निकाल जाहीर होईल मतदानाचे व मतमोजणीचे स्थळ निवडणुक निर्णय अधिकारी पी.एस. पाटोळे हे नंतर जाहीर करतील असे कळविले आहेत.
दरम्यान चांदवड मर्चन्ट बॅकेच्या निवडणुक लढविणा:या उमेदवारांना आठ दिवसाचा काळ फक्त प्रचारासाठी मिळणार आहे. दरम्यान मागील पंचवार्षीक निवडणुकीत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या गटाची सत्ता आली होती. आतापावेतो कोतवाल गटाचीची सरशी चांदवड मर्चन्ट बॅकेत झालेली दिसून येत असून दोन तिन दिवसात बैठकांना जोर येईल व चित्र स्पष्ट होईल असे दिसते तर ही निवडणुक अटीतटीची होईल असे चित्र दिसत आहे.मध्यंतरी काळात चांदवड मर्चन्ट बॅकेची परिस्थिती नोटबंदीनंतर थोडी अवघड होती त्यावेळी या बॅकेने पन्नास कोटीच्या ठेवी या सध्या शंभर कोटीवर गेल्या असून या पाच वर्षात विद्यमान संचालक मंडळाने चांदवड मर्चन्ट बॅकेचा कारभार चांगला केला असून याच पाच वर्षात चांदवड मर्चन्ट बॅकेची अद्यावत इमारत झालेली असून संचालक मंडळाला ही जमेची बाजु असल्याचे बोलले जात आहे.