चांदवड- महंत बन्सीपुरीजी महाराज यांचे प्रेरणेने व व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांचे मार्गदर्शना स्वामी दयानंदजी महाराज ( प्रथम चंद्रेश्वरबाबा ), महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदपुरीजी महाराज ( द्वितीय चंद्रेश्वरबाबा ) श्री चंद्रेश्वरी माता मंदिर जिर्णोध्दार भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
स्वामी जयदेवपुरीजी महाराज व भक्त परिवारातील प्रातिनिधीक स्वरूपात ज्येष्ठांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या शुभप्रसंगी पंचक्रोशीतील भक्त मंडळी उपस्थित होते. सोहळा यशस्वीतेसाठी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराने परिश्रम घेतले. सदर कार्य हे लोकसहभागातून होत आह , त्यामुळे मंदिर जिर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन यावेळी करण्यात आले.