मधूर गुजराथी
चांदवड – मनमाड -लासलगाव रोडवर चांदवड तालुक्यातील वागदर्डी धरणाजवळ सुभाष बेदमुथा यांच्या पडीत जागेवर अनिल रतन अहिरे ( ४३) रा. पिंपळगाव धाबळी या तरुणांचा ७ फेब्रुवारी रोजी खुन झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी मयत अनिल अहिरे याचा मेहुणा गंगावे येथील दत्तात्रय विश्वनाथ उबाळे याने खून केल्याचे उघडकीस आले असून सदरचा खून अनैतिक संबधातुन झाल्याचे परिसरात बोलले जात आहे. तर सीसीटीव्ही फुटेज तपासणीवरुन हा खुन उघडकीस आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. तर मयत अनिल रतन अहिरे यास दत्तात्रय उबाळे याने दारु पाजुन त्याच्या डोक्यात व अंगावर वार करुन खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या खूनातील संशयीत दत्तात्रय उबाळे यास चांदवड न्यायालयात उभे केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील , मुकेश गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बागुल, हवालदार सोनवणो, लोखंडे, गांगुर्डे, कुणाल मोरे व चांदवड व मनमाड पोलीसांनी अवघ्या १२ तासाच्या आत गुप्त माहितीद्वारे मनमाड चांदवड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन संशयीत दत्तात्रय विश्वनाथ उबाळे रा. गंगावे यास काल ८ फेब्रुवारी रोजी रात्री गंगावे येथून ताब्यात घेतले आहे. या गुन्हयात अजुनही काही संशयीत असणार असल्याचा पोलीसांचा अंदाज असून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अधिकारी या खूनातील धागेदोरे तपासत असल्याचे सांगण्यात आले.