चांदवड – तालुक्यातील मेसनखेडे येथील दीपक विठोबा पिंपळे ( ३७ ) यांनी गुरुवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील अडगईला दोरीचा सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर पोलीस पाटील अनिल मारूती ठोंबरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह पोलीस नाईक हरिचंद्र पालवी व उत्तम गोसावी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आधिक तपास पोलीस करीत आहे.पिंपळे यांची उत्तरीय तपासणी करून शव नातलंगाचे ताब्यात दिले .त्याच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुली. असा परिवार आहे.
तळेगावरोही शिवारात रेल्वेतुन पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
चांदवड – चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारात रेल्वे लाईनवर पंपावर अज्ञात पुरुष जातीच्या व्यक्ती अंदाजे वय ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह बुधवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास रेल्वेतुन पडून कंटीग होऊन सापडल्याची खबर तळेगावरोहीचे पोलीस पाटील अविनाश एकनाथ अहिरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हरीचंद्र पालवी हे करीत आहेत.