मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड व देवळा तालुक्यात आगामी सर्व निवडणुकीत आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगरपरिषद व सर्वच स्थानिक पातळीवरील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आली पाहीजे. त्यासाठी सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी व सर्व आघाडीच्या प्रमुखांनी जोमाने कामास लागले असे प्रतिपादन पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी केले. चांदवड येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या सभागृहात चांदवड व देवळा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. शासन, मंत्री , हे तर सर्वच विकास कामे देणार आहेत. मात्र आपल्या मतदार संघात राष्ट्रवादीची मुठ बांधली गेली पाहीजे. आपल्या तालुक्यात विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते सर्वच बैठका व भूमिपुजनास हजर राहतात. आपण विरोधी आहे. आपल्याला नेहमीच विरोधात राहावे लागते ही भावना सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाजुला ठेऊन आपणच सर्वच क्षेत्रात आघाडी घेऊन काम करावे राज्यात आपले सरकार आहे असे छगन भुजबळ यांनी सांगीतले.
चांदवड -देवळा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद ,कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर निवडणुका तसेच स्थानीक सर्वच निवडणुका, राष्ट्रवादी नोंदणी अभियान राबविण्यासाठी सदरची बैठक असल्याचे प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी सांगीतले. तर आगामी सर्व निवडणुका कार्यकत्र्याना लढवायच्या असतील तर राष्ट्रवादीचे सक्रीय सभासद होणो गरजेचे आहे त्याशिवाय पक्षाचे तिकीट मिळणार नाही असे पगार यांनी सांगीतले. यावेळी माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, विजय जाधव, दत्तात्रय वाघचौरे, प्रकाश शेळके,पुरुषोत्तम कर्डक , प्रेरणा बलकवडे, उपसभापती शिवाजी सोनवणो, उत्तम आहेर, विजय गांगुर्डे, अरुण न्याहारकर, यशंवत शिरसाठ, रिजवान घासी, तुकाराम सोनवणो, डॉ. दिलीप शिंदे, अरुण न्याहारकर, नवनाथ आहेर, शहाजी भोकनळ, दिलीप आहेर, भुषण शेळके, अमोल खैरे , परशराम निकम यांनी पक्षीय अडचणी मांडल्यात . तर यावेळी चित्र शिंदे महिला आघाडीप्रमुख, विकी जाधव शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्ष रोहीत बाजीराव हिरे , चांदवड तालुका सरचिटणीस , नितीन घुले, अमोल खैरे, देवळ्याचे वनिता शिंदे, संतोष शिंदे ,ऐश्वर्या आहेर आदिचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस साधना पाटील, अनिल पाटील, कल्पना शिरसाठ, उदय आहेर, सुखदेव जाधव, रघुनाथ आहेर, अमोल भालेराव, खंडेराव आहेर, आदिसह राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख , सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.