चांदवड- चांदवड तालुक्यातील खंडाळवाडी येथील अरुण माळी या रुग्णास रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने रुग्णालयाच्या पायरीवर त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. पण, प्रशासने दखल न घेतल्याने गोरगरीब जनतेच्या मनात नाराजगीचा सूर व्यक्त करण्यात आला असुन अशोक हिरे ,चंद्रभान साळवे यांनी १७ मे पासून उप जिल्हा रुग्णालय चांदवड समोरच उपोषणाला बसले होते. पण, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
तालुक्यातील रुग्णांना अवाच्या सव्वा रकमेची भरपाई करून गोरगरीब जनतेवर अन्याय होत असल्याचे नातेवाईकाकडून सांगितले जात होते. अरुण माळी या कुटुंबाला शासनाच्या वतीने योग्य ती आर्थिक मदत किंवा इंदिरा आवास योजना किंवा राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळण्यात यावे ,कुटुंबासह सगळ्या गोर गरीब योग्य ती मदत व सहकार्य करावे या हेतूने उपोषण अशोक भिवाजी हिरे व चंद्रकांत साळवे या उपोषण कर्त्यांनी मागणी केली होती.
आज २० मे रोजी उपोषणाच्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ,देवळा चांदवड निरीक्षक सुनील आहेर यांनी न्याय मिळवून देण्याचे उपोषण कर्त्याना आश्वासन देऊन जिल्हा शल्य चिकित्सक थोरात ,प्रांत आधिकारी देशमूख यांच्या बरोबर चर्चा करून उपोषला सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक थोरात ,प्रांत आधिकारी देशमूख, पोलीस निरीक्षक बारावकर ,देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ,देवळा चांदवड निरीक्षक सुनील आहेर ,सचिन शिंदे यांच्या हस्ते उपोषणआर्थीना ज्यूस देऊन उपोषण स्थगित करण्यात आले असून योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले.
याप्रसंगी आर के मामा, शिवाजी दवंडे, गणेश ठाकरे ,सचिन कोतवाल ,शंभू खैरे ,दत्ता गांगुर्डे, राजाभाऊ आहिरे ,सुनील सोनवणे ,सोमनाथ जाधव ,आनंद बनकर ,देवळा रायुकॉ तालुका उपाध्यक्ष धनंजय बोरसे उर्फ पपु, विलास माळी आदी उपस्थित होते.