चांदवड – चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रारोडवर वडाळीभोई शिवारात दुचाकीचा ताबा सुटल्याने रोडच्याकडेला असलेल्या छोटय़ा ब्रीजखाली एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, चांदवड ते नाशिक जाणार या ट्रॅकवर हॉटेल निकोताचे ब्रिजखाली भोला राजेंद्र पवार (२१) रा. शिंदेरोड वडाळीभोई यांचा हिरो कंपनीच्या दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे रोडच्याकडेला असलेल्या छोटय़ा ब्रीजखाली ओहळात ते पडले व त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी वडनेरभैरव पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन. घुमरे हे करीत आहेत.