मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील राहुड येथे मळ्यात दोन जणांनी भांडी व दागीने पॉलीस करुन देण्याच्या बहाण्याने दोन सोन्याच्या पोती किमंत रुपये दीड लाखाची चोरी करुन दुचाकीवरुन पसार झाल्याची फिर्याद विठ्ठल सखाराम पवार रा. राहुड यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. २७ जानेवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहुड येथील मळ्यात दोन अज्ञात इसम अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील दोन जण दुचाकीवर आले. त्यांनी दागीने पॉलीस करुन देतो असे सांगुन मणीमंगळसुत्र तीन तोळे वजनाचे नव्वद हजार रुपये व सोन्याची पोत अंदाजे वजन दोन तोळे किंमती रुपये साठ हजार असा एकूण दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद विठ्ठल पवार यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव हे तपास करीत आहेत.