मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील अदिवासी महिलेची झोपडी तोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील जयाबाई भिका माळी या अदिवासी महिलेस संजय गंगाधर गुंजाळ, गुलाब गंगाधर गुंजाळ, गंगाधर कोंडाजी गुंजाळ, विष्णु पंढरीनाथ गुंजाळ सर्व रा. कातरवाडी यांनी २४ जानेवारी रोजी जयाबाई माळी यांची सरकारी जागेवर असलेली झोपडी ग्रामपंचायतीने जेसीबीने लोटून दिल्याने वाद झाला होता. याचवेळी आजुबाजुचे झाडे तोडून नुकसान केली व तुम्ही येथे राहु नका, ही काय तुमच्या बापाची जागा आहे का, तुम्ही राहील्यास तुमचे तंगडे तोडू टाकू अशी धमकी दिल्याने जयाबाई माळी यांना दिली होती. या घटनेची तक्रार माळी यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्यानंतर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक समीरसिंग साळवे व चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली. तर घटनेचा तपास समीरसिंग साळवे हे करीत आहेत.