चांदवड – चांदवड येथील सोमवारचा आठवडेबाजार सुरु करावा अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख व चांदवडचे मुख्यधिकारी अभिजीत कदम यांना शिवसेनेचे शहरप्रमुख संदीप उगले, दीपक शिरसाठ, प्रसाद प्रजापत, बापु राऊत, गणोश लहरे, ईस्माईल तांबोळी, नितीन बनकर, नरेंद्र बनकर, बापु गांधी यांच्या शिष्टमंडळाने दिले. चांदवड शहरातील सर्व किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसाईक कापड, भाजीपाला ,फळ विक्रेते आदिसह सर्वच व्यावसाईकांवर आठवडी बाजार सोमवारी बंद केल्याने नुकसान होत आहे. तर मजुर व सर्वसामान्यांना बाजार बंदचा फटका बसत असल्याने सर्वाचे गणित चुकले आहे. सोमवारी अनेक वर्षापासून ग्रामीण भागातून नागरीक खरेदीसाठी सोमवारी येतात तरी सर्व नियमाचे विक्रेते व ग्राहक पालन करतील तरी सोमवारचा आठवडेबाजार त्वरीत सुरु करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.