चांदवड – चांदवड येथील डायफुट्र व्यापा-यास काजु व बदाम होलसेल खरेदी प्रकरणी सुमारे ९ लाख ११ हजारांची ऑनलाईन पध्दतीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यापारी संदीप शिरसाठ यांनी विश्वासघात व फसवणुक केल्याची फिर्याद दिली असून राजकोटचे ड्रायफ्रुपट व्यापारी जितेंद्र परमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. शिरसाठ या ड्रायफ्रुट व्यापा:याने जितेंद्र छगनभाई परमार यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे डायफुट्र माल मागवून विक्री करतांना परमार यांनी काजु व बदामचे एकुण १९ लाख ५३ हजार पाचशे रुपयाची ऑनलाईन पध्दतीने मालाची मागणी केली. त्याबद्दल्यात सात टन काजु व चार टन बदाम येणो बाकी असतांना परमार यांनी दोन टन काजु व ४.७५ टन किलो बदाम पाठविले. त्यानंतर वेळोवेळी संदीप शिरसाठ यांनी पैशांची मागणी केली असता परमार यांनी पन्नास हजार व एक लाख रुपये असे एन.ईएफटीने सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यात पाठविले तर परमार यांच्याकडे ९ लाख ११ हजार रुपये येणे बाकी असून त्यांने वेळोवेळी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संदीप शिरसाठ यांचा विश्वासघात व फसवणुक केल्याची फिर्याद संदीप शिरसाठ यांनी केल्याने परमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.