चांदवड– मनमाड-लासलगाव चौफुलीवर सर्कल बांधण्यात यावे यासाठी चांदवडच्या ‘गुड मॉर्निंग’ग्रुपच्या वतीने चांदवडचे प्रांताधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित कदम यांना निवेदन देण्यात आले. मनमाड -चांदवड रस्त्याचे विस्तारीकरण होत असून या रस्त्यावरील मनमाड -लासलगाव चौफुलीवर वाहतूक जास्त प्रमाणात होत असते. या चौफुलीवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी या ठिकाणी एक सर्कल तयार करण्यात यावे जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. व वाहतूकही सुरळीत होईल .तसेच चांदवड ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली नगरी असल्याने या सर्कलवर ऐतिहासिक चेहरा उजळ करेल अशा आशयाचे एक स्मारकही बसवण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. एम.एस.आर.डी.सी.नाशिक येथील अभियंत्यांना देखील लवकरच निवेदन देणार असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. यावेळी गुडमॉर्निंग ग्रुपचे सदस्य के.के.ट्रेडिंग कंपनीचे संचालक कैलास कोतवाल,संजय बनकर,वसीम शेख,विष्णू थोरे,संजय इंगळे,शैलेश पवार,बी.डी.साळवे,विकास भुरीया,कमलाकर कुंभार्डे आदी उपस्थित होते.