चांदवड- येथील प्रसिद्ध गायक व संगीतकार योगेश खंदारे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे देण्यात येणारा २०२१ या वर्षांचा आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार जाहीर नुकताच जाहीर झाला आहे.”आर्ट बिट्स पुणे”या फौंडेशन कडुन हा पुरस्कार नाशिक येथे २० डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून,पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चांदवडचे गीतकार विष्णू थोरे यांनी लिहिलेले ‘भगवा झेंडा’ हे योगेश खंदारे यांनी गायलेले गीत दरम्यान लोकप्रिय झाले होते.येणाऱ्या एका आगामी मराठी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्याचे काम देखील योगेश खंदारे यांनी केले आहे.