चांदवड : आज चांदवड मनमाड रस्त्याचे काम चालू असून या ठिकाणी अनेक प्रश्न अडथळ्यांचे ठरत आहे, चांदवड येथील प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल,मुख्याधिकारी अभिजित कदम,रस्त्याचे प्रोजेक्ट मॅनेजर मरजिवे चामको बँकेचे व्हा.मॅनेजर सचिन खैरनार यांच्या उपस्थितीत आज विविध विषयांवर बैठक संपन्न झाली. यावेळी चांदवड शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ४४ गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन ड्रेनेज लाईन वर असून त्या खाली त्याखाली पाण्याची पाईपलाईन आलेली आहे, भविष्यात जर ही पाईपलाईन डॅमेज किंवा तूट फूट झाली तर लिकेज काढणे किंवा चांगले पाणी दूषित होउ नये यामुळे साथीचे आजार पसरण्यास वेळ लागणार नाही यासाठी उपाय योजना म्हणून आताच नियोजन करावे असे स्थानिक नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच शहरातील रस्त्यालगत असलेले रेणुका कॉम्लेक्स व मार्केट यार्ड समोरील गाळे यांची उंची व रस्त्याची उंची ही सारखीच झाली आहे आणि त्यावर रस्ताचे बांधकाम झाल्यावर अजून रस्त्याची उंची वाढेल त्यामुळे सर्व पाणी आमच्या गाळ्यामध्ये येथील त्यामुळे सदर रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे असे स्थानिक गाळा मालक यांनी राज्य मार्ग व प्रोजेक्ट मॅनेजर मरजिवे याना सांगितले.
तसेच गटारची पाइप लाईनची उंची कमी करावी जेणे करून शहरात साचणारे पाणी हे ड्रेनेज च्या माध्यमातून निचरा होण्यास मदत होईल याच बरोबर 1) लासलगाव मनमाड व चांदवड शहरात येणारा खंडेराव रस्ता 2) गणुर चौफुली येथे गणुर नाशिक हायवे कडे जाणारा मनमाड कडे जाणारा व चांदवड शहरात येणारा मुख्य रस्ता 3) कृषी उत्पन्न बाजार समिती चा गेट-उपजिल्हा रुग्णायल व पोलीस स्टेशन गेट-बसस्टॉपवर व कॉलेजरोड व कोर्ट कडे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना व वाहन धारकांना येण्याजण्यासाठी व शहराला जोडणारा रस्ता प्रमुख असल्याने येथील काय सोय होणार तसेच याला लगत साईड पट्टी किती आहे तसेच येथील रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे त्यासाठी नियोजनव प्रत्येक चौकात हायमास्ट बसविण्यात यावे .याचबरोबर चांदवडची शहराची हद्द जीत पावेतो आहे तिथपर्यंत दुतर्फा स्ट्रीटलाईट (पथदीप) लावण्यात यावे.
तसेच बाजारतळ येथे संपूर्ण शहराचे पाणी येत असून इथे पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करावी व ठराविक ठिकाणी नियोजन बद्दल उंची कमी अधिक करून पाण्याचा निचरा कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करावे असे यावेळी चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सांगितले.तसेच रस्त्याची रुंदी वाढवत असताना अनेक जुन्या झाडांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली असल्याने याच्या चार पट नवीन झाडे लावून त्याची जोपासना करू ती पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या नियोजनाने व शासकीय नियमाप्रमाणे चांदवड नगर परिषद हद्दीमध्ये असलेल्या या ठिकाणची झाडे चांदवड नगर परिषदेकडे गुगल मॅप नुसार वर्ग करावी असे चांदवडचे मुख्य अधिकारी यांनी सांगितले,यावेळी संबंधित डिझाईन बघितली त्यावर रिजनल ऑफिस सर्कल हे नाशिक हे संबंधित यंत्रणा असून रस्त्याचे डिझाईन मध्ये तात्काळ बदल करावा व गावच्या व स्थानिक अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली एक-मेकांच्या मार्गदर्शनाखाली बदल करून नियोजित काम करावे अशी विनंती करण्यात आले.यावेळी पाणीपुरवठा योजनेचे तेजस कंपनीचे तंत्राटदार आर के पाटील,संदीप उगले,राजकुमार संकलेचा,पप्पू भालेराव,बांधकाम अभियंता शेषराव चौधरी, सचिन कोल्हार,शांताराम भवर,प्रसाद प्रजपत,प्रतीक काटकर आदी नागरिक उपस्थित होते.