चांदवड :- राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना बरोबर येणार असतील तर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन शेतकरी हितासाठी व चांदवडच्या विकासासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकत्र लढण्यास तयार आहोत. मागील वेळेस थोड्या फरकाने आपल्या काही जागा पराभूत झाल्या असल्या तरी यावेळी त्या उणीवा दुर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.ही निवडणूक पक्षविरहित असल्याने अनेक पक्षातील समविचारी लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढवू, असे प्रतिपादन चांदवडकडे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी चांदवड येथे तुळजाई लाँन्स मध्ये झालेल्या बैठकीत केले. काँग्रेस पक्ष व समविचारी कार्यकत्यांची बैठक व दिवाळी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या फराळाच्या कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, विविध पक्षातील कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व पक्षीय मित्रांना सोबत घेऊन चांदवड कूषी उत्तम बाजार समितीच्या चाचपणीच्या बैठकीत संपूर्ण चांदवड तालुक्यातील संपूर्ण परिसरातून अशा बैठकीसाठी प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे.मतदार राज्याने हि निवडणूक आजच हातात घेतलेली आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यात येतील व त्यासाठी चांदवड बाजार समितीत टोमॅटो मार्केट सुरू करण्यात येईल व रायपूर, वडाळीभोई, पारेगाव, भोयेगांव येथे उपबाजार सुरू करू असे सांगितले.यावेळी संपतराव वक्ते,दत्तु ठाकरे, अनिल ठाकरे, भिमराव जेजुरे, केशव खैरे, शिवाजी कासव, विजय कुंभार्डे,सुरेश उशीर, भरत ठाकरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्तमराव ठोंबरे, समाधान जामदार, राजेंद्र गिडगे,वडनेरभैरव सरपंच सुनिलमामा पाचोरकर, भाऊसाहेब शेलार, चंद्रभान भालेराव, भगवान खताळ, पोपटराव पगार, अशोक जाधव,कांतीलाल निकम, पंकज दखणे,लक्ष्मण आहेर, पप्पू कोतवाल, धोंडीराम पिंपरकर, विलास निकम, अरूण रकिबे, अरुण पगार, उत्तम झाल्टे, रावसाहेब गांगुर्डे, प्रकाश जैन,संजय कोल्हे,प्रकाश कुरणे, रामभाऊ मोरे,भाऊसाहेब पठाडे, राजु गांगुर्डे, किसनराव जाधव, गोरख रकिबे,अप्पासाहेब ठाकरे, नामदेव पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कॉंग्रेस चे सरचिटणीस शिवाजी कासव यांनी सूत्रसंचालन केले.