चांदवड – येथील युवा सेवा संघ तर्फे दिवाळी निमित्त आज गरीब वस्त्यांवर जाऊन कपडे व फराळ वाटप करण्यात आले.
आज सुद्धा समाजात मोठी आर्थिक दरी आहे. बऱ्याच ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त सुखसुविधा आहेत व बऱ्याच ठिकाणी गरजेपुरते सुद्धा नाही. प्रत्येक घरात दिवाळी साजरी केली जातेच असे नाही. दुसऱ्यांसाठी खर्च करण्यास कोणी सहज तयार नाही , देणग्या सहज मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन ज्यांच्याकडे वापरण्या योग्य कपडे, शाल, रजाई, साड्या उबदार कपडे जास्त असतील त्यांचेकडून जमा करावे व ज्यांना आवश्यकता आहे त्यांना नेऊन द्यावेत ही या हेतूने बाल संस्कार केंद्र, महिला उत्थान , ऋषी प्रसाद तसेच युवा सेवा संघ हे सुद्धा याच प्रकारे दिवाळी साजरी करतात व प्रेरणा देतात. चांदवड येथील युवा सेवा संघ तर्फे या वर्षी ही गावातून तसेच कॉलनीतून कपडे गोळा करण्यात आले. वर्गणी मागून फराळ पाकीट तयार करण्यात आले. राजदेरवाडी गावात जाताना ज्या वस्त्या लागतात तेथील गरजू लोकांना दिवाळी निमित्त कपडे व फराळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी सर्व साधक परिवार तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.