चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची ना.छगन भुजबळ यांच्याकडे मागणी
चांदवड- अतिवृष्टीने बाधित शेतकरी अनुदानासाठी चांदवड तालुक्याचा समावेश करावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांदवडच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांना आज देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुर आणि अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . अशा बाधित शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली . त्यात नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचाही समावेश आहे . परंतु चांदवड तालुक्याचा समावेश नसल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहे . चांदवड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात घटस्थापना से दसरा या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला . तालुक्यातील ओझरखेड कालव्याला कोणतेही आवर्तन सोडलेले नसताना केवळ ढगफुटी सदुष्य पाऊस झाल्याने वाहेगांवसाळ येथे हा कालवा दोन ठिकाणी फुटला . त्यामुळे या परिसरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले . ऑक्टोबर महिन्यातील झालेल्या पावसाने सोयाबीन , मका , कांदारापे कांदा इ . पिकांचे नुकसान झाले . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे .त्यामुळे सरकारने अनुदान वाटपात दुजाभाव न करता ऑक्टोबर महीन्याचाही समावेश करून न्याय देण्याचा प्रयत्न करावा. असे निवेदन चांदवड राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ . सयाजीराव गायकवाड , शैलेश ठाकरे ( जिल्हा उपाध्यक्ष ) अनिल पाटील ( जिल्हासंघटक ), दिपक शिंदे ( उपाध्यक्ष ), दत्तात्रय वाघचौर तालुकाध्यक्ष ( रा.यु. कॉ . चांदवड ), विक्रम जगताप ( जिल्हा उपाध्यक्ष ) दर्शन घुले ( जिल्ला उपाध्यक्ष ) आदींनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांना दिले आहे.