चांदवड – नगर परिषदेकडून ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभी करणाऱ्या सोसायट्यांना मिळकत करामध्ये सवलत दिली जावी .तसेच नवीन सोसायट्यांना नगर परिषदेने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची सक्ती करण्यात यावी . आणि या सहकारी सोसायट्यांना पाणी बचतीच्या प्रक्रियेत आणण्यासाठी त्यांना ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभी करण्यासाठी अनुदान देण्यात यावे अशी अपेक्षा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आजीव सभासद अशोक हांडगे यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात दररोज घरगुती वापरासाठी करता येईल. त्यामुळे पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग होणार आहे. शहरात सहकारी सोसायट्यांमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची सोय उपलब्ध करण्यासाठी सोसायट्यांना अनुदान देण्याचा निर्णय नगर परिषदेने घेण्यात यावा . आणि सहकारी सोसायट्यांनी व शहरातील विविध कॉलन्यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन पाणी संवर्धन आणि साठवणुकीसाठी पुढे आले पाहिजे’, अशी अपेक्षा हांडगे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पण तरीही खेडय़ातील स्त्रीचे पाण्यासाठीचे हेलपाटे कमी होत नाहीत. दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा वाढत्या प्रमाणात जाणवत आहे, पण गेल्या १०० वर्षांतील पाऊसमानात फारसा फरक पडलेला नाही. उटल पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून अतिवृष्टीत दुपटीहून जास्त वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांत विदर्भ-मराठवाडय़ात ५००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणासाठी आत्महत्या केल्या आहेत. या सगळ्याचे मूळ कारण पावसाचा लहरीपणा हे आहे व त्यातून सुटका करून घेण्यासाठी पावसाचे पाणी साठवले पाहिजे.जर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा असेल तर प्रत्येक खेडय़ाने आपल्या शिवारात पडलेला पाऊस अडविला पाहिजे व लहान बंधाऱ्यात साठविला पाहिजे. त्यामुळे भूजलाची पातळी वाढते. पाणी काटकासरीने वापरणे बंद झाले. परिणामी पाणी तुटवडा पडणाऱ्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे हि परिस्थिती बदलण्याकरिता योग्य नियोजन केले पाहिजे.