चांदवड– चांदवड येथील चौफुलीवर शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चांदवड चौफुलीवर भगव्या ध्वजाच्या स्तभांचे ध्वजारोहनही राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सुनील जी बागुल, सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, चांदवड तालुका प्रमुख विलास भवर, चांदवड शहर प्रमुख संदीप उगले, शिवसेना नेते जगनआबा राऊत, शिवसेना महिला प्रमुख अनिता पुरकर, सचिन खैरनार, अॅड. विनायक ,कारभारी आहेर शहर संघटक प्रसाद प्रजापत, उपशहर प्रमुख गुड्डू करणार, शंभू खैरे, जगन आबा राऊत, राजू संकलेचा, मुकेश कोतवाल, सागर बर्वे, रोशनी कुंभार्डे, कविता उगले, सोमनाथ पगार, केशव ठाकरे, गमाजी राजे, रवी काळे दादा, अहिरे युवा सेना शहर प्रमुख सुरज भोसले, राज केदारे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.