चांदवड- राज्य सरकारला आरक्षण टिकवण्यात आलेले अपयश तसेच ओबीसीचा विश्वासघात केल्याचा आरोप करत आज चांदवड तालुका भाजपतर्फे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, आघाडी सरकारने सर्वोच न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजु मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. गेल्या ६ महिन्यापासून आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डाटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करा. असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या ६ महिन्यात काहीच हालचाली केल्या नाही. इम्पिरीकल डाटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधी दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे. याचा आम्ही पुर्णपणे निषेध करतो. तरी वरील मागणीचा तात्काळ विचार न केल्यास येणाऱ्या भारतीय जनता पार्टींच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. याची या सरकारने नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस यांनी सांगितले की, हे आघाडी सरकार एक डोळ्यावर आपले हात ठेवून डोळे बंद करत आहे. एक कान आपले झाकून जनतेचा ऐकून घेत नाही तर एकाने बोलतीच बंद केली आहे. महाविकास आघाडी सरकारने हे असे वागणे बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी बाळासाहेब माळी मनोज शिंदे आदींनी आपल्या भाषणातून जोरदार टीका केली. यावेळी चांदवड तालुक्याचे गणेश महाले, सूनील शेलार, मोहन शर्मा, बाळासाहेब वाघ, अशोक काका व्यवहारे,योगेश ढोमसे, अण्णासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर बरकले, विजय धाकराव, वाल्मीक वानखेडे, अंबादास ठोंबरे,भाऊराव देवरे, महेश खंदारे ,शांताराम भवर ,रामदास कांदळकर ,मन्सूर भाई मुलांनी, बापूसाहेब जाधव, विक्रम शिंदे, , सुभाष पुरकर, सुदाम गायकवाड, दीपक संगपाळ, डॉक्टर राजेंद्र दवंडे,देवा पाटील, मनोज बांगरे,महेंद्र कर्डीले,राजाभाऊ आहिरे आदी उपस्थित होते.