चांदवड- वारकरी कलावंत सन्मान निधी मिळवून द्यावा यासाठी वारकरी साहित्य परिषद, चांदवड तालुक्याच्या वतीने चांदवड तालुका तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारकरी साहित्य परिषद,नाशिक जिल्हा सचिव ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे,जिल्हा मार्गदर्शक ह.भ.प.राजेंद्र महाराज काळे,ह.भ.प.संजय आव्हाड सर,चांदवड तालुका अध्यक्ष सचिव शाम महाराज गांगुर्डे, सचिव ह.भ.प.निळोबा महाराज बोरसे,ह.भ.प.गंगाधर महाराज गांगुर्डे,ह.भ.प.सचिन महाराज ठाकरे,कैलास खैरे,ह.भ.प.रविंद्र महाराज कोतवाल,अविनाश अहिरे,संतोष म महाले,विलास म गांगुर्डे,समाधान महाराज ठाकरे,शामराव महाराज गांगुर्डे,इत्यादी वारकरी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ या महामारीद्वारे भजन ,किर्तन,प्रवचन,भागवत,रामायण,शिव कथा,या माध्यमांतून धार्मिक,समाजप्रबोधन,साप्ताहिक,अखंड हरिनाम सप्ताह असे कार्यक्रम बंद असल्याने वारकरी कलावंतांना उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे,या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्याप्रमाणात संत विचार,कथा,किर्तन, प्रवचन,भारुड,गौळण या माध्यमातून न्याय,नीती,धर्म,सदाचार,वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, देशभक्ती, स्त्री भ्रूण हत्या,मातृपितृ सेवा,संतविचार यांचा प्रचार-प्रसार या सारखेच अनेक विषयांवर प्रबोधन करून संतविचार जनमाणसात रुजवून सुसंस्कृत आदर्श समाज घडविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहोत.या सर्व बाबींचे विश्लेषण संगीतबद्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडून या वर्गामध्ये किर्तनकार,प्रवचनकार,भागवतकार,गायनाचार्य,मृदुंगाचार्य,भारुडकार या जवळ-जवळ सर्वच महाराज मंडळीं शेतकरी व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत,गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी लॉकडाऊन या मुळे सर्व मंदिरे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी असल्याने वारकरी संप्रदायातील किर्तनकार व कलावंत यांच्या वर उपासमारीची वेळ आलेली असताना याचा विचार करता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या वारकरी सांप्रदायिक किर्तनकार यांना आर्थिक मदत प्रत्येकी ₹ पाच हजार मिळावी तसेच यांच्या नावाची यादी प्रसिद्ध नसल्याने आम्ही आपणांस विनंती करतो की,निवेदनासोबत जोडलेल्या यादीचा आधार घेत त्यांच्या नावाची नोंद होऊन लवकरात लवकर मदत मिळावी याकामी आम्ही वारकरी साहित्य परिषद अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडे यादी सादर करत आहोत. तसेच गेल्या काळात महाराष्ट्र शासनाने हे काम हाती घेतलं होते परंतु सध्याचा कोविड-१९चा वाढता पादुर्भाव पाहता ते होऊ शकते तरी आम्ही आपणांस विनंती करितो की,आपल्या माध्यमातून सन्मान निधी मिळावा.