चांदवड– नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली चांदवड नगर परिषदेच्या विविध विकास कामांना निधी मिळणे बाबत तसेच चांदवड नगर परिषदेसाठी चालू असलेल्या विविध विकास कामांच्या अडचणीबाबत सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना चांदवड शहरप्रमुख संदिप उगले यांनी चांदवड नगर परिषद हद्दीतील विविध अडचणींचे आणि विकास कामांचे प्रस्ताव नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांच्यासमोर मांडले. यावेळी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी चांदवड हे माझे मूळ गाव असून चांदवड शहराच्या विकासासाठी निधी मिळावा अशी विनंती एकनाथ शिंदे यांना केली. शिंदे यांनी संदिप उगले यांनी मांडलेल्या प्रस्तावाचा सखोल विचार करून सदर प्रस्तावाबद्दल सकारात्मकता दर्शविली.