चांदवड – येथील नॅक मानांकित ‘ अ ’ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील सहाय्यक प्राध्यापिका ख्याती निर्मल यांनी नुकतेच के. एल. विद्यापीठ, विजयवाडा आंध्र प्रदेशची पीएचडी पदवी संपादन केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी इम्प्रोविंग अँड ऑप्टिमायझिंग के -प्रोटोटाइप क्लस्टरिंग अल्गोरिदम युजींग फ्रिक्वेन्सी बेस्ड डिससिमिलॅरिटी मेजरमेंट अँड मॅप रिड्युसिंग प्रोग्राम या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांना प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, उपप्राचार्य व संगणक विभाग प्रमुख डॉ. महेश संघवी, के. एल. विद्यापीठाचे मार्गदर्शक डॉ. के. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. ख्याती निर्मल यांनी पीएचडी संपादन केल्याबद्दल विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमारजी सुराणा,उपाध्यक्ष अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलालजी भंडारी व सुनीलकुमारजी चोपडा आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.