चांदवड- तालुक्यातील श्री क्षेत्र उसवाड येथे यंदाही श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बहिण हारकुबाई यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेऊन श्री दत्त मंदिर (आत्मतिर्थ स्थान) ची स्थापना केली.त्यानंतर पुजारी वर्गाची नेमणूक केली.साधारणपणे १७६८साली या मंदिरांची स्थापना करून आज पर्यंत या ठिकाणी त्रिकाल आरती केली जाते.असंख्य भाविक जन्माष्टमी ला येतात परंतु या वर्षी कोरोणा महामारीचे निर्बंध पाळुन श्री कृष्ण जन्माष्टमी चार कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संजय सावळीराम पवार त्याचबरोबर अशोक मुनी मराठे, प्रभाकर मुनी आंबेकर , प्रविण आंबेकर, विजय आंबेकर, वैभव आंबेकर आदी आंबेकर परिवार व घुले परिवार उपस्थित होते