चांदवड – आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळा व कळवण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चांदवड तालुक्यातील स्व.मा.आ.जयचंदजी दी. कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा खेलदरी,अनुदानित आश्रमशाळा खडकजांब व शासकीय आश्रमशाळा पारेगाव यांच्या वतीने एकूण ४९ हजार रुपये रक्कम कोविड काळात मदतनिधी म्हणून चांदवडचे तहसिलदार प्रदीप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील कोविड -१९ कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या विकट परिस्थिती मध्ये रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधोपचार , मेडिसीन , ऑक्सिजन वायू व अन्य अत्यावश्यक साधनांचा पुरवठा होण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे . अनेक ठिकाणी आवश्यक साधनांचा तुटवडा निर्माण झालेला असून सद्यस्थितीस राज्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन , मेडिसीन व अन्य अत्यावश्यक साधन पुरवठा होणे गरजेचे आहे या हेतूने आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प कळवण कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चांदवड आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक , अधिक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद याचेद्वारा मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वेच्छेने , स्वयप्रेरणेने मदतकार्य म्हणून कोविड -१९ जन सहाय्यता निधी रक्कम ४९ हजार उभारण्यात आला.सदर निधी तालुका स्तरावर तहसीलदार यांचे कडे जमा करण्यात आला. हा निधी तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली निधीचा विनियोग सुयोग्यरित्या करण्याचे विनंती आदेश आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी केले.
निधी वाढीसाठी प्रयत्न करावेत