चांदवड – राष्ट्रसंत आचार्यश्री देवनंदिजी महाराज यांच्या प्रेरणेने नमोकार तीर्थ व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या सहकार्याने नमोकार तीर्थावर ४९४ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात व पाय प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. साधू वासवानी मिशनचे जनरल मॅनेजर सुंदर वासवानी, कृष्णा वासवानी ,चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आहेर ,माजी जिल्हा परिषद सदस्य कारभारी आहेर ,ओमजी पाटणी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे ,एपीआय शेख, पूनम सचेंती,डॉ मनोज छाजेड,पिंटू सचेंती यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला
याप्रसंगी झालेल्या प्रवचनात आचार्यश्री देवनंदीजी महाराज यांनी सेवाही परमो धर्म आहे मंदिरे शाळा ,हॉस्पिटल हे बांधण्यात जेवढे पुण्य प्राप्त होते त्यापेक्षाही जास्त पुण्य साधू वासवानी मिशन पुणे यांनी लाखो दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात आनंद देणाऱ्या व चालण्याची शक्ती प्रदान करण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमात आहे व आज माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरात लिहण्याचा क्षण आहे असेही सांगितले. दोन दिवस चाललेल्या ह्या शिबिरात राजस्थान ,मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश महाराष्ट्रातील विविध भागातून तीन वर्षांपासून नव्वद वर्षापर्यंत आबाल वृद्ध सहभागी झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आश्रू उमटत होते अनेकांनी आचार्य श्रीचें आशीर्वाद घेत व्यसन व मांसाहार न करण्याचे शपथ घेतली
याप्रसंगी सुंदर वासवानी, ओमजी पाटणी, मांगीतुंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला, आ डॉ राहुल आहेर, तहसीलदार प्रदीप पाटील, ट्रस्टी विजय लोहाडे ,पवन पाटणी, पों नि समीर बावरकर, गवारे ब्रह्मचारी वैशाली दीदी, नितीन फ़ंगळ,यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिशनचे सलील जैन मिलिंद जाधव, सुशील ढगे आदी स्वयंसेवक व संजय कडनोर ,सोनवणे सर, देवरेसर ,योगेश अजमेरा , राकेश जैन , जीवन पाटणी ,अक्षय कोतकर, संमकीत संचेती ,रितेश सचेती, अक्षय संचेती ,रौनक संचेती, प्रज्योत संचेती मयुर दगडे, सचिन दगडे , दगडे ,किशोर कुमावत, मुकेश भिडे ,कुणाल राहणे ,अक्षय कोतकर, प्रकाश साबळे , जितेंद्र देशमुख ,रोहित देव यांनी दोन दिवस परिश्रम घेतले संयोजन विनोद पाटणी यांनी केले