चांदवड – चांदवड तालुक्यातील मंगरूळ, आसरखेडे, भोयेगाव व शेलू येथे आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे आमदार डॉ.आहेर यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मंगरूळ येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत बौद्ध विहारच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. आसरखेडे स्थानिक विकास निधी अंतर्गत खंडेराव मंदिर समोरील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. भोयेगाव तिसगाव, बहादुरी, वडाळीभोई, भोयेगाव रस्ता रामा २५ की.मी. ३३/५०० मध्ये पूल बांधणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शेलू स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता काँक्रीटी करण करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषणजी कासलीवाल, कृ.उ.बा.समिती सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.नितीन गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समिती सभापती सौ.पुष्पाताई धाकराव, यु.मो. तालुका अध्यक्ष शांताराम भवर, बाळासाहेब वाघ, सुनील शेलार, मोहन शर्मा, अशोक भोसले, विजय धाकराव, सुभाष पुरकर, गोरख ढगे, वाल्मीक वानखेडे, पोलीस पाटील, बाजीराव वानखेडे, बाळासाहेब ठाकरे, गणपत ठाकरे, राहुल जाधव, उत्तमराव ठोंबरे, लक्ष्मण गलांडे काका, शिवनाथ बोरसे, योगेश ढोमसे, साहेबराव ठोंबरे, शरद ढोमसे, फौजी नाना घुले, सरपंच रेखाताई ढोमसे, अनिल मते, बाळू कावळे, विजय जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.