चांदवड – येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व सौ. कांताबाई भरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्री. स्वप्नील आबासाहेब पटारे यांना आय. आय.टी. बॉम्बेकडून पी.एच.डी.प्रदान करण्यात आली. त्यांनी बेडींग, बॅकलिंग आणि व्हायब्रेशन अँन्यालीसीस ऑफ हायड्रो पिझ्झो इलेकट्रीक फंक्शनली ग्रेटेड प्लेट या विषयावर पी.एच.डी. केली. यासाठी त्यांना प्रा. के. एम. बाजोरिया यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी नवीन इमारत बांधण्यासाठी पिझ्झो इलेकट्रीक मटेरियल साहित्य या संदर्भात संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे अधिक सुरक्षित इमारत बांधणे शक्य होणार आहे, जर या प्लेट्स बांधकाम करताना कॉलममध्ये टाकल्या व काही कारणास्तव नैसर्गिक आपत्ती आली जसे भूकंप , भूस्खलन इ. तर इमारतीच्या स्ट्रक्चरमध्ये सिग्नल मिळणार असल्याने जीवित हानी टळण्यास मदत होणार असून समाजाला देखील याचा फायदा होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल विश्वस्त समितेचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी, श्री. सुनीलकुमारजी चोपडा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम आर संघवी , सिव्हिल विभागप्रमुख डॉ.वाय. एल. भिरूड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.