चांदवड- तालुक्यातील राहुड येथील माजी फौजी वाल्मिक पवार यांनी स्थापन केलेल्या कै. गंगाधर भावराव पवार बहुद्देशीय संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज करिअर अकॅडमीचे उद्घाटन चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते राहुड येथे माध्यमिक शाळेच्या पटांगणात नुकतेच संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड पोलीस दलातील दीपक मोरे, राजू गायकवाड यांच्यासह हेमंत पवार,कल्पेश जगताप, सीताबाई पवार आधी मान्यवर उपस्थित होते.
परिपूर्ण होण्यासाठी दिशादर्शकाची खरी गरज असते. चांगले व्यक्तिमत्व घडवताना श्रमासोबत अभ्यासही तरुणांनी केला पाहिजे. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजे. अकॅडमी विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजू भक्कम करीत असते. असे मार्गर्शन या वेळी चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी व्यक्त केले. पोलीस कॉन्स्टेबल दीपक मोरे व सौरव सूर्यवंशी यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी रमेश पवार,राजेंद्र पवार,आप्पाजी वानखेडे,धर्मा सोमवंशी, माजी सरपंच सचिन निकम, नामदेव पवार,जनार्दन पवार,साहेबराव पवार, तुकाराम पुरकर, सुखदेव सोमवंशी,अशोक सोमवंशी, सुनील निकम, बाबुराव सूर्यवंशी, संजय पवार,माणिक पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विष्णू थोरे यांनी केले.