चांदवड – अखेर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा पोलीसांनी लावला आहे. या चोरी प्रकरणात लासलगाव मधून आरोपी रमजू भैयालाल पठाण (वय ३९) याला मुद्देमालासह अटक केली आहे. १० लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला होता. सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी दिली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ४ जुलैच्या आसपास ही चोरी झाली होती. कोतवाल यांच्या शहरातील राहत्या घरांमधून, घराला लावलेले कुलूप तोडून घरातील मुद्देमाल चोरुन नेला. या चोरी प्रकरणी राहुल शिरीषकुमार कोतवाल यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले होती की, लोखंडी कपाटातील ड्राव्हर उघडून त्यामधून दहा हजार रुपये रोख, त्यात पाचशे रुपये दराच्या १६ नोटा, शंभर रुपयाच्या २० नोटा, ६ लाख रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र सोन्याची पोत १५ तोळे, ३ लाख २० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, १६ हजार रुपये किमतीचे कानतील वेल अंगठी, चांदीचे पायातले तीन जोड पैंजण २० भाराचे, सहा हजार रुपये चांदीचे पायल पाच जोड १० भाराचे, लेदरच्या फाईल मध्ये ठेवलेले जमीन साठेखत, मूळ कागदपत्र सही केलेले कोरे स्टॅम पेपर, आयकर विभागाचे कागदपत्र, असा एकूण १० लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला.
त्यानंतर चांदवड पोलीस ठाण्यामध्ये राहुल शिरीषकुमार कोतवाल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी अपर पोलीस अधीक्षक खांडवी, उपविभागीय पोलीस निरीक्षक समीरशिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या विशेष पथकाने लासलगाव मधून आरोपी रमजू भैयालाल पठाण याला मुद्देमालासह अटक केली आहे.