चांदवड – दरड कोसळण्याच्या घटना ठिकठिकाणी होत असतांना चांदवड तालुक्यातील मौजे वडबारे येथेही अशीच दुर्घटनेची बातमी आली. त्यामुळे काही काळ पळापळ व गर्दी झाली. पण, त्यानंतर मॅाकड्रिल असल्याचे कळाल्यानंतर सर्वांनी नि:श्वास सोडला. सकाळी ११ वाजता हे मॉकड्रिलचे करण्यात आले. मौजे वडबारे येथून सकाळी ११ वाजुन ४ मिनीटांनी तहसिल कार्यालयाचे आपत्ती कक्षास फोन आला. त्यानंतर ही धावाधाव सुरु झाली. त्यानंतर तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हा आपती नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली. व सर्व तालुका स्तरीय संबंधित यंत्रणांना मॉकड्रिलच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने आपले अधिनस्त सर्व यंत्रणा कार्यन्वीत करण्याची दक्षता घेऊन सभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्र सामग्री व माहितीसह उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले.
यावेळी सर्व संबंधित यंत्रणा तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, सा.बांधकाम विभाग, म.रा.वि.वि.कंपनी , दुरसंचार निगम, तालुका आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नगर परिषद व चांदवड टोलनाका येथील कर्मचारी आवश्यक साहित्यासह ( जे.सी बी.मशिन , अॅम्बुलन्स , ट्रॅक्टर ५ ) पुढील १५ मिनिटांमध्ये उपस्थित झाले. मॉकड्रिलच्या व आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व प्रात्यक्षिके व माहिती उपस्थित नागरिकांना तहसिलदार चांदवड यांनी दिली. तसेच ग्रामस्थांना येणा – या अडचणी व काही सुचना करणेबाबत कळविण्यात आले. वडबारे येथील सरंपच ताईबाई आहेर व जेष्ठ नगारीक बापु आहेर यांनी मागील काळात वडबारे येथील आपत्तीबाबत माहिती दिली.
हे आवाहन करण्यात आले
चांदवड तालुक्यातील सर्व नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सुनचा पाऊस मोठया प्रमाणात होत असून त्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठया प्रमाणात जिवीतहानी तसेच पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच यापुढे ही मोठया प्रमाणात पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्याअनुषंगाने तालुका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष व तालुका प्रशासनाचे वतीने सर्व नागरिकांनी आपत्तीच्या अनुषंगाने काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आपत्तीबाबत तात्काळ तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षास व सबंधित यंत्रणेस तात्काळ माहिती देण्यात यावी.
महत्वाचे संपर्क
चंद्रशेखर देशमुख , उपविभागीय अधिकारी, चांदवड मो.नं. ९ ७३०६७५००८
प्रदीप पाटील तहसिलदार , चांदवड मो.नं.९ ८ ९ ०४६० ९ २२
महेश पाटील गटविकास अधिकारी , चांदवड – मो.न.९९ ६०१७६३६४
समीर बारवकर पोलीस निरीक्षक , चांदवड मो.नं.९ ४०४७७०८००
संजय मोरे उपविभागीय अभियंता , सा.बां.विभाग चांदवड – मो.नं .८८०६४६४७६०
डॉ.पंकज ठाकरे तालुका आरोग्य अधिकारी , मो.नं.९ ८.३४६५६१३७ / ८३ ९ ०५०८४८२
अभिजीत कदम मुख्याधिकारी , न.प.चांदवड -७५८८६१८६३४
विजय कोळी , उपअभियंता जि.प.बांधकाम ( इवद ) चांदवड -9326153515
संजय कुमठेकर , उपअभियंता जि.प.ल.पा. चांदवड – ९ ८२०७७ ९ ८ ९ ०
डी.एम.गवारे पोलीस उपनिरीक्षक , वडनेरभैरव -९९ २३३३६८८६
टोल फ्री क्रमांक -१०७७ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग ,
जिल्हाधिकारी कार्यालय , नाशिक दुरध्वनी क्र . ( ०२५३ ) २३१७१५१ , २३१५०८०
तहसिल कार्यालय , चांदवड / तालुका आपत्ती व्यवस्थापन क्र.०२५५६-२५२२३१ पाटील )