चांदवड – इलेक्ट्रीक शॉक लागल्याने आज काजीसंगवी येथील शेतकरी प्रकाश उमाजी ठाकरे (वय ५३ वर्ष) यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रवींद्र सखाराम गरे यांनी दिली. उमाजी ठाकरे हा काजीसांगवी शिवारातील शेतातील बोवेलची इलेक्ट्रीक मोटार चालु करणेसाठी सकाळी ११ सुमारास गेला असता त्यास इलेक्ट्रीक शॉक लागला. त्यास प्रथम औषधोपचारासाठी खासगी हॉस्पीटलमध्ये चांदवड येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील औषधोपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी चेक करून त्याला मयत घोषित केले. या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.