चांदवड – चांदवड तालुका भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय पाडवी ( बाळा ) यांनी पौराणिक संदर्भ असलेल्या साडेतीन रोडगा डोंगरावर ” रामध्वज “उभारत व साडेतीन रोडग्यांचा नैवेद्य डोंग-या देवास अर्पण करत… आदिवासी जातीरिवाजा प्रमाणे ‘ निसर्ग देवता ‘ पूजन करून सर्व दुर्गप्रेमींना दूर्मिळ झाडांच्या माहीतीचे पुस्तक भेट दिली. साडेतीन रोडगे डोंगराची अनोखी प्राचीन कथा आहे. अगस्ती ऋषींनी स्वतःसाठी चार रोडगे बनविले होते व चांदवड नगरीत नागरिकांकडे त्यावर लावण्यासाठी तुप मागीतले. पण, लोकांनी तुप दिले नाही. त्यामुळे रागावलेले ऋषींनी चांदवडला चांडाळ नगरीचा शाप दिला व अर्धा रोडगा गाईला देऊन साडेतीन रोडगे उंच डोःगरावर फेकले. त्यातून निर्माण झालेले हे डोःगर. पुढे वनवासात असतांना प्रभू श्रीराम यांचे या डोंगरावर वास्तव्य होते. त्यावेळी संपूर्ण परिसर शापमुक्त केला… अशी आख्यायिका आहे. लोक फक्त शापच लक्षात ठेवतात मात्र प्रभु श्रीरामांनी शापमुक्ती दिली हे लक्षात ठेवत नाहीत…. म्हणुन पाडवी यांनी या निमित्तानं हा अनोखा वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रकाश सुर्यवंशी, प्रफुल्ल सोनवणे, डॉ शिंदे , जितेंद्र डाके, सुताने सर, भक्ती सोनवणे, सिद्धी डाके, मानस कोल्हार, समीर सुताने आदी उपस्थित होते.