चांदवड- राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ उवळे यांनी चांदवड तालुक्यातील गणुर येथे भेट देऊन कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची पाहणी केली. सदर भेटी दरम्यान त्यांनी गणुर येथील अनिता प्रशांत जाधव यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेस भेट दिली व तयार असलेल्या रोपांची पाहणी करून मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यात काय उपाय योजना करता येतील याबाबत मार्गदर्शन करून शंकाचे निरसन केले. तसेच एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते ट्रॅक्टर सुपूर्द करण्यात आले. यावेळी नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक सचिन पडवट, जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी विवेक सोनवणे,आत्मा योजनेचे संपादक राजेंद्र निकम व उपसंपादक हेमंत काळे,उपविभागीय कृषी अधिकारी विलास सोनवणे,प्रगतशील शेतकरी गणेश ठाकरे,अरुण ठाकरे,कृषिभूषण शिवनाथ बोरसे,केशव चव्हाण,बाळू खुटे,भीमा जाधव,विष्णू थोरे,रिजवान घासी,राजू साळवे आदी उपस्थित होते.