चांदवड – येथील श्री रेणुका मंदिराकडे जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्ग लगत शुक्रवारी मध्यरात्री पाणीपुरवठा करणारे कामगार वकील सुकलाल झमरे ( वय २५ वर्ष रा.पाणवाडा, तालुका जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश) यांने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती घरातील त्यांची आत्या नसरीबाई सदू चव्हाण यांनी पोलीसांना दिली. झमरे यांच्या भावाने काही दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आईचा कर्करोगाने तर वडिलांचा अपघाताने मृत्यू झाला. त्यामुळे तो नैराश्यात होता. त्यातच बहिणीच्या लग्नासाठी दीड ते दोन लाख रुपये कर्ज यामुळे त्याच्या आर्थिक अडचणीही वाढल्या. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. झमरे चांदवड शहरात चालू असलेली नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी काम करत होता. साधारण रात्री बारा ते तीन या दरम्यान गळफास घेऊन सदर त्याने आत्महत्या केली असावी असे सांगितले जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक चांदवड तसेच इतर पोलिस स.पो.उ.नि.शेख, ठाणे हमलदार बी.आहिरे व इतर कर्मचारी हे करत आहे.