गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चांदवड- भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेतर्फे प्रांत अधिकारी यांना पिकविमा योजनेबाबत निवेदन

जुलै 23, 2021 | 6:02 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210723 WA0216

 

चांदवड– प्रधानमंत्री पिकविमा योजनेला अनुसरुन सन २०२०-२१ या सालातील चांदवड तालुक्यातील ५३३१ शेतकऱ्यांना त्वरीत पिकविम्याचा लाभ मिळवून देणेबाबत आज उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने अतिवृष्टी, अवर्षण, दुष्काळ, कीड रोग इ. कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली आहे. या योजनेत केंद्र सरकार ४० टक्के , राज्य सरकार ४० टक्के व शेतकरी २० टक्के अशी विम्याची रक्कम संबंधीत कंपनीला भरीत असतात. या योजनेला अनुसरुन सन २०२०-२१ या वर्षाकरीता शासनाने नेमून दिलेल्या भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे चांदवड तालुक्यातील १३७४९ शेतकऱ्यांनी बाजरी, मका, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग, कांदा या पिकांचा विमा खरीप हंगामात संबंधीत कंपनीकडे भरला होता. साधारणत: ७६६८ हेक्टर क्षेत्राचे संबंधाने हा विमा शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कोरानाची भीषणता असताना आर्थिक परिस्थिती नसतांना देखील भरला होता. असे असतांना गेल्या वर्षी अतिवृष्टी व लष्करी अळीमुळे विमा भरलेल्या पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा परिस्थितीत खरीप पिकांचे पूर्णत: नुकसान झाले होते. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेत महसूली अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन तसे अनुदानही थोड्याफार प्रमाणात दिले होते. असे असतांना शेतकऱ्यांनी भारती एक्सा जनरल इन्शून्स कंपनीकडे विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर कृषी खात्याकडे देखील विमा भरपाई मिळण्यासाठी तक्रारीकेल्या होत्या. तक्रारी केल्यानंतर केवळ ८४१८ शेतकऱ्यांना कंपनीने विम्याची नुकसानभरपाई दिली. व उर्वरीत ५३३१ शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने संबंधीत पिकाचे नुकसान होऊनही विम्याला अनुसरुन संबंधीत पिकाची नुकसानभरपाई देणे नाकारले. वास्तविक तालुक्यातील प्रत्येक गावातील विमाधारक शेतकऱ्याचे नुकसान झालेले होते. संबंधीत कंपनीने फक्त हेतुपुरस्करपणे ठराविक शेतकऱ्यांनाच प्रत्येक गावात नुकसानभरपाई दिली . वास्तविक एकाच बांधालगतच्या एका शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते व दुसरा लगतचा शेतमालक विमा भरुनही त्याला नुकसानभरपाई कंपनीने नाकारली हे कंपनीचे वागणे दुटप्पीपणाचे व ते विमा भरलेल्या शेतकऱ्यांव अन्यायकारक आहे.

मुळात शेतकऱ्यांना शेतमालाची अनिश्चीत उत्पन्नाची नुकसानभरपाई सामुहिक स्वरुपात मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु केलेली आहे. असे असतांना संबंधीत कंपनीने लोकलाइज, वैयक्तीक पूर्व कल्पना, ७२ तासात तक्रारी, प्राणीहल्ला लागू नाही इ . कारणे दाखवत अटी व शर्ती व नियमांचे चुकीचे निकष लावून ५३३१ शेतकऱ्यांना विमा देण्याचे नाकारले. वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नंबरवर तात्काळ फोनही केले, कृषी अधिकाऱ्यांनाही कळविलेले होते . मुळात खेड्यांमध्ये वीज व इंटरनेटचा प्रॉब्लेम असताना व कोरोनाची परिस्थिती असतांना तालुक्यातील संबंधीत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही विमा कंपनीचा प्रतिनिधी मुळात वेळेत आलाच नाही. वेळेनंतर जो कोणी आला त्याने ठराविक लोकांचे सातबारा उतारे व पावत्या जमा केल्या व इतर शेतकऱ्यांना विमा मिळू नये म्हणून इतर शेतकऱ्यांकडे जाण्याची देखील तसदी संबंधीत प्रतिनिधीने घेतली नाही. वास्तविक हे सर्व रेकॉर्ड प्रत्येक शेतकऱ्याचे संबंधीत कंपनीकडे ऑनलाइन होतेच त्याबरोबर कृषी विभागाकडे देखील होते. पण हेतुपुरस्करपणे संबंधीत कंपनीने जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळू नये, म्हणून शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूक केली आहे व संबंधीत कंपनीने नियमांची पायमल्ली केलेली आहे.

किसान सभेने कृषी अधिकारी व विमा कंपनीकडे वेळोवेळी संबंधीत उर्वरीत लोकांना तात्काळ विम्याचा लाभ द्यावा म्हणून चौकशी केली होती. मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या सर्वांच्या माध्यमातून यांनी आपल्या निवेदनाद्वारे असे सांगतिले. महसूल विभागाने नुकसानीनंतर केलेल्या पाहणीला अनुसरुन व कंपनीने विमा देण्याच्या संबंधाने चुकीचे निकष लावले. विमा कंपनीने त्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्व सूचना, आदेश , संबंधीत शासन निर्णय इ.चे उल्लंघन केलेले आहे. म्हणून संबंधीत विमा कंपनीची महाराष्ट्र शासनानेसखोल चौकशी करुन त्यांच्या रेकॉर्डची पाहणी करुन कंपनीने नाकारलेल्या कारणांची कारणमिमांसा याची पडताळणी करुन चांदवड तालुक्यातील उर्वरीत शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ द्यावा व संबंधीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट तीव्र आंदोलन छेडेल असे निवेदनात म्हटले आहे .यावेळी अॅड . दत्तात्रय गांगुर्डे(जिल्हा सेक्रेटरी ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,भास्करराव शिंदे(जिल्हाध्यक्ष,किसान सभा),सुकदेव केदारे(जिल्हा उपाध्यक्ष,किसान सभा), रंगनाथ जिरे,अण्णा जिरे,नामा मोरे आदी नागरिक उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

Next Post

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
carona 11

नाशिक अपडेट - शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011