चांदवड- चांदवड तालुक्यातील व विधानसभेतील पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री डॉ.भारतीताई प्रवीण पवार यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. या भेटी प्रसंगी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल दादा आहेर, नाशिक जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष केदानाना आहेर, चांदवड नगरीचे माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा परिषद गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समिती सभापती विजय धाकराव, माजी सभापती नितीन गांगुर्डे, गणेश महाले, योगेश ढोमसे, सुभाष पुरकर,युवा भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भवर,धोडंबे येथील सरपंच संदीप काळे,शुभम निकम, वैभव धामणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ.राहुल आहेर यांनी आपल्या चांदवड देवळा विधानसभा मतदार संघासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात यावा व यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून विधानसभा मतदार संघाचा व जिल्ह्याचा शेतकरी व कष्टकरी वर्गाचा आर्थिक परिस्थिती सुधारेल व विविध असलेले प्रश्न मार्गी लागतील. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्या शेती वर्गाचा शेतकऱ्यांचा कच्चामाल तयार होतो त्यासाठी जास्तीत जास्त कसा हमीभाव मिळेल यासाठी प्रयत्न करावे व सुजलाम-सुफलाम असे कार्यक्षेत्र बनावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विविध प्रस्ताव मांडून निधीसाठी मागणी देखील केली.
या भेटीत भूषण कासलीवाल यांनी आपल्या चांदवड नगरपरिषद हद्दीत झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १२० घरे मंजूर झाली असून या प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत,१२० घरापैकी केंद्र शासनाचे पैसे नगर परिषदेस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे जेणेकरून त्यांना स्वतःच्या हक्काच्या पक्या घरचे स्वप्न साकारता येईल ही मागणी केली. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याचा अंदाज मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वी रडारची मागणी केली ती लवकरात लवकर पूर्ण करावी व येथील शेतकरी वर्गास दिलासादायक बातमी मिळावी. जेणेकरून काही तास अगोदर येथील हवामानाचा अंदाज आल्याने शेतकरी वर्गाला येणाऱ्या वारे-वादळ तसेच बेमोसमी पावसाचा अंदाज घेता येतो. यामुळे शेतीचे व इतर होणारे नुकसान हे कळतेव त्याला वेळीच लगाम बसतो पूर्व तयारी करता येते साठी आम्हाला ही कामे प्रायोगिक तत्त्वावर मार्गी लावून द्यावी अशी विनंती केली.